इंडिगो कंपनीच्या बाजारमूल्याची उंच भरारी   

अमेरिकेच्या डेल्टा एअरलाइन्सला टाकले मागे

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्सने बुधवारी बाजार भांडवलाच्या बाबतीत अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सला मागे टाकत जगातील सर्वात मूल्यवान विमान कंपनी बनली आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, इंडिगोच्या शेअरने (इंटरग्लोब एव्हिएशन) पाच हजार २६२.५ चा उच्चांक गाठला. कंपनीचे बाजार मूल्य २३.२४ अब्ज डॉलरवर पोहचले असून, ते अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्सचे बाजार मूल्य २३.१८ बिलियन डॉलरहून अधिक आहे. मात्र, इंडिगोचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. कारण भारतीय शेअर बाजार बंद होईपर्यंत इंडिगो शेअरचा भाव पाच हजार १९४ वर घसरला. त्यामुळे इंडिगो कंपनीचे बाजारमूल्य २३.१६ बिलियन डॉलरवर आले.
 
इंडिगो ही एकमेव भारतीय विमान कंपनी आहे, जी जगातील सर्वोत्तम १० विमान कंपन्यांच्या यादीमध्ये आहे. इंडिगोच्या दर आठवड्याला १५ हजार ७६८ विमान सेवा आहेत. ज्यामध्ये १२.७ टक्के वाढ झाली आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे.

भारतीय नागरी उड्डाण क्षेत्रातील वाढ

भारतातील हवाई प्रवासाच्या वाढत्या मागणी पाहता भारतीय विमान कंपन्यांनी २०२३ पासून बरीच मोठी विमाने तयार करण्यास सांगितले आहे. एअर इंडिया समूहाने फेब्रुवारी २०२३ मध्ये ४७० विमाने मागविली आहेत. त्यामध्ये २५० एअरबस आणि २२० बोईंग विमाने आहेत. इंडिगोने जून २०२३ मध्ये एअरबससोबत ५०० ए३२० एनइओ विमाने खरेदी करार केला. ही जगातील सर्वात मोठी विमान ऑर्डर मानली जाते. २०२४ मध्ये अक्सा एअरने बोईंगकडून १५० बी७३७ मॅक्स विमाने मागविली आहेत, तर इंडिगोने ३० ए ३५० विमाने खरेदी केली आहे. जी तिच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या विस्तारास महत्त्वपूर्ण ठरली आहेत. 
 

Related Articles